शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धेत दीपाली शिरहट्टी प्रथम

राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी क्लब मालवणचा उपक्रम

*⚡मालवण ता.०३-:* राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने मालवण येथे रोटरी क्लब मालवणच्यावतीने घेण्यात आलेल्या शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धेत मालवण रेवतळे येथील दीपाली प्रकाश शिरहट्टी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने मालवण येथे रोटरी क्लब मालवणच्यावतीने शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती बनविणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली हाेती. हि स्पर्धा हॉटेल जानकी कुंभारमाठ, मालवण येथे घेण्यात आली. स्पर्धेत एकुण ३० स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला हाेता. सदरची स्पर्धा रोटरी क्लब मालवणच्या माता व बालसंगोपन चेअरमन रोटेरियन डॉ. लीना लिमये यांनी पुरस्कृत केली हाेती. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक – दीपाली प्रकाश शिरहट्टी (रुपये १५०० /- चषक व प्रमाणपत्र) द्वितीय क्रमांक – प्रज्ञा रूपेश तायशेटे (राेख रुपये १२००/- व प्रमाणपत्र) तृतीय क्रमांक – विद्या फेलिक्स फर्नांडिस (राेख रुपये १०००/- व प्रमाणपत्र) यावेळी व्यासपिठावर स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या मालवणच्या नगरसेविका शीला गिरकर, क्लबचे अध्यक्ष रो. उमेश सांगोडकर डीसीसी रो. डॉ लीना लिमये ,सेक्रेटरी रो.रतन पांगे , रो. सोनल पालव, डॉ. गार्गी ओरसकर, स्पर्धेचे परिक्षक डॉ. शुभांगी जाेशी, स्मृती कांदळगांवकर व राे. विनय गावकर उपस्थित होते . स्पर्धेचे उद्घाटन अन्नपूर्णा देवीची पूजा करून करण्यात आले. या स्पर्धेचे प्रास्तविक राे. डॉ. लीना लिमये,सुत्रसंचालन राे. साेनल पालव व आभार राे. रतन पांगे यांनी मानले. यावेळी चाचा हडकर, डॉ. अजित लिमये, सुविधा तिनईकर, महेश काळसेकर, अभय कवटकर, महादेव पाटकर, सुहास ओरसकर, भाऊ साळगांवकर, अभय कदम हे राेटेरियन उपस्थित हाेते.

You cannot copy content of this page