माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली मागणी
*⚡मालवण ता.०३-:* कोरोना महामारीमुळे जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी लोक पैशांची जमवाजमव करत आहेत. त्यामुळे लोक अडचणीत असताना गणेशोत्सव काळात वीज वितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली करू नये तसेच वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळातर्फे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. साखरे यांच्याकडे केली. दरम्यान, अभियंता साखरे यांनी या मागण्या वरिष्ठांकडे मांडून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. मालवण शहर व परिसरातील वीज समस्या व वीज बिल वसुली बाबत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने मालवण येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अभियंता श्री. साखरे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. यावेळी सुदेश आचरेकर यांच्यासमवेत नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, आपा लुडबे, भाजपचे विजय केनवडेकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, बाळू तारी, सदा चुरी, आपा मोरजकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
