वीज कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास मंत्र्यांचे लक्ष वेधणार

जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वीज वितरणला दिला इशारा

*⚡मालवण ता.०३-:* कोरोना महामारी काळात नागरिकांचे व्यवसाय बंद असूनही वाढीव वीज काढली गेली आहेत. वीज वितरण कंपनीच्या चुकांमुळे ही वाढीव बिले आली असून या बिलांच्या वसुलीसाठी सक्ती केली जात असून वीज जोडणी तोडण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची वीज जोडणी तोडू नये, वीज कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास मंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वीज वितरणच्या अभियंता सौ. सोनाली यांच्याकडे केली. मालवण तालुक्यातील वीज समस्यांबाबत जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मालवण च्या वीज वितरण कार्यालयात अभियंता सौ. सोनाली यांची भेट घेऊन लक्ष वेधले. त्यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, युवक काँग्रेसच्या पल्लवी तारी, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळू अंधारी, योगेश्वर कुर्ले अमृत राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page