प्रत्येक घरात अहिल्याबाईंची प्रतिमा वाटप करणाऱ्या सरमळेतील संदीप जंगलेचा सन्मान

दिल दोस्ती गृप सिंधुदुर्गचा उपक्रम

*⚡कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात धनगर वस्त्या ब-याच प्रमाणात आहेत.या धनगर वाडी वस्तीवर प्रत्येक घरात राषट्रमाता अहिल्याबाई होळकर याची प्रतिमा असणे गरजेचे असून जिल्ह्यातील धनगरवाडीत प्रथमतः अहिल्याबाईची प्रतिमा लावून 100 % पूर्ण करेल त्या वाडीचा दिल दोस्ती गृप सिंधुदुर्ग तर्फे वाडीत जाऊन रोख रू 2000/- बक्षिस देऊन सत्कार करणेत येईल असे दिल दोस्ती गृप सिंधुदुर्ग “च्या वतीने आव्हान केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत सरमळे( शितपवाडी). ता सावंतवाडी येथील यूवा नेतृत्व श्री.संदिप जंगले यानी आपल्या स्वखर्चाने प्रत्येक घरोघरी राजमाता अहिल्याबाई होळकर याची प्रतिमा देऊन पूजन करून प्रथम क्रमांक पटकाविला त्याचा आदर म्हणून 29.08.2021 रोजी सरमळे ( शितपवाडी) येथे जाऊन श्री.धोंडू जंगले याच्या घरी दिल दोस्ती गृप सिंधुदुर्ग च्या वतीने रोख रक्कम. सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नामदेव जंगले यानी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्याची संपूर्ण माहिती श्री.संदिप जगले व श्री.भैरू पाटील यानी विशद केली. कार्यकम स्थळी जेष्ठ नागरीक श्री. जानू विठू जंगले याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.दिल दोस्ती गृप सिंधुदुर्ग गृपचे अध्यक्ष श्री.महादेव खरात.यानी गृपचे उद्देश.त्याची कार्यपद्धती व गरजू होतकरू कूटूंबाना मदत करण्याचा मानस असल्याचे आवर्जून सागितले. याप्रसंगी गृपचे सचिव रमेश शिंदे व सदस्य राजू ताटे,राजेश जानकर, शेखर डोईफोडे, लकी डोईफोडे, लक्ष्मण पाटील, विनोद कोळेकर. दिपक ताटे.बळीराम कोकरे.सूरेश ताटे व वाडीतील महिलासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार गृपचे खजिनदार श्री.राजू ताटे यानी मानले.

You cannot copy content of this page