नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांचे आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्याकडून स्वागत

*⚡मालवण ता.०३-:* नव्याने आचरा पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचा आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे याची बांदा पोलीस स्टेशनला बदली झाल्याने आचरा पोलिस स्टेशनचा प्रभारी कार्यभार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या कडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधिकारी बदलीत आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार दोडामार्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अगोदरही तौक्ते वादळ काळात काही काळ आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार पाटील यांनी सांभाळला होता. पाटील यांचे सरपंच प्रणया टेमकर यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नाडिस, ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर,बाबू कदम,युवक विभागीय अध्यक्ष चावल मुजावर, कृष्णा तारकर, शेखर कांबळी, उदय घाडी, सचिन हडकर, आदी मान्यवर उपस्थित होते. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे याची बांदा पोलीस स्टेशनला बदली झाल्याने आचरा पोलिस स्टेशनचा प्रभारी कार्यभार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या कडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधिकारी बदलीत आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार दोडामार्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अगोदरही तौक्ते वादळ काळात काही काळ आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार पाटील यांनी सांभाळला होता.

You cannot copy content of this page