*⚡मालवण ता.०३-:* आचरा गावात बिबट्याचा संचार वाढला असल्याने याबाबत वनविभाग कर्मचारी शिंदे, वनसंरक्षक परीट यांनी आचरा येथील भोसले यांच्या वाड्यावर भेट देवून उपस्थितांना बिबट्या बाबत माहिती दिली. बिबट्या दिसल्यास कोणतेही गैर कृत्य न करता वन विभागाला माहिती कळवावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले. वन अधिकाऱ्यांनी बिबट्याबाबत फलकाद्वारे जागृती करण्याच्या सुचना यावेळी केल्या. यादृष्टीने युवकांतर्फे बिबट्याचा वावर असलेल्या आचरा पारवाडी, वरचीवाडी परीसरात जागृती फलक लावण्यात आले. आचरा परिसरात बिबट्याच्या संचारामुळे पाळीव जनावरांना ही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थानी सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी कोणतेही गैर क्रूत्य करू नका, ज्या योगे बिबट्या बिथरून हल्ला करेल .बिबट्या दिसल्यास वन कर्मच्याऱ्यांना कळविण्यात यावे, असे यावेळी वन अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राजेश भोसले, स्वप्नील गोसावी, मंदार सरजोशी, यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
बिबट्या दिसल्यास वन विभागाला माहिती कळवावी – वनपाल शिंदे
