Headlines

गणेशोत्सवात व्यापाऱ्यांनी दुकांनसमोर गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी

सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील

*⚡मालवण ता.०३-:* कोरोना महामारीचे संकट अद्यापही कमी झालेले नसून धोका कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सव उत्सव सर्वांनी सुरक्षेच्या उपाययोजना करून साजरा करावा. व्यापारी बांधवानी दुकानासमोर गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आचरा व्यापाऱ्यांशी बैठकीत बोलताना केले केले आहे. आचरा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील हे बोलत होते. या बैठकीला आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, विद्यानंद परब,निखिल ढेकणे, पंकज आचरेकर, आशिष बागवे, सिद्धांत हजारे,चंदू कदम, पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांनी व्यापाऱ्यांनी गणेश चतुर्थी कालावधीत होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने सुरक्षेसाठी मास्क सँनिटायझरचा वापर करून दुकानासमोर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या. आठवडा बाजाराच्या अनुषंगाने होणारी गर्दी, आचरा तिठा येथे गर्दी मुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होवू नये या बाबत उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आचरा गावासाठी अतिरिक्त दहा होमगार्ड देण्यात येणार असून गणेश चतुर्थी कालावधीत गर्दीचा फायदा घेत चोरीचे प्रकार होवू नयेत यासाठी आपण स्वतः गस्त घालणार असून व्यापारी बांधवांनीही चौकस राहून असे प्रकार आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचे पाटील यांनी सांगितले.

You cannot copy content of this page