माजी खासदार किरिट सोमय्या यांचे कणकवलीत जंगी स्वागत

भाजप कार्यकर्त्यानी केली जोरदारघोषणाबाजी

*⚡कणकवली ता.०३-:* भाजपचे फायरब्रँड नेते तथा माजी खासदार किरिट सोमय्या हे कणकवलीत दाखल होताच नरडवे नाका येथे भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भव्य स्वागत केले.भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षाच्या विजयी घोषणा दिल्या.नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है..! भारत माता की जय। …! अशा घोषणा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत,तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर,उपाध्यक्ष सोनू सावंत,महेश गुरव,प्रज्ञा ढवण,बबलू सावंत, राजन चिके,शहर अध्यक्ष आण्णा कोदे,युवा भाजपा मोर्चाचे सचिव संदीप मेस्त्री,गणेश कासवनकर,वागदे माजी सरपंच संदीप सावंत,प्रदेश सदस्य सुरेश सावंत,राजन परब,सचिन परधीये,विजय चिंदरकर, पपू पूजारे,देवगड युवकचे श्री.लोके,बाळा पाटील,पिसेकामते सरपंच सुहास राणे,आनंद घाडी,सुभाष मालणकर,मेघा गांगण,प्राची कर्पे, प्रतीक्षा सावंत,जाणवली चे संदीप सावंत, पंढरी वायगणकर आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन किरीट सोमय्या कणकवलीत आले.यावेळी त्यांच्या सोबत भाजपा आमदार नितेश राणे,व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page