*⚡कणकवली ता.०२-:* येथील कणकवली महाविद्यालयातील तृतीय वर्ष भूगोल वर्गातील विद्यार्थी व एनसीसी छात्र सैनिक सिद्धेश सदानंद गुरव यास राष्ट्रीय पातळीवरील छायाचित्र स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कोकण किनारपट्टीत यंदा पहिल्यांदाच हा बहुमान प्राप्त झाला असून सिद्धेश गुरव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जे. एम. पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भंडारा या महाविद्यालयाने नुकतीच राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सिद्धेश गुरव यांनी पाठवलेल्या निसर्गचित्रांची दखल घेऊन त्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. या राष्ट्रीय स्पर्धेत कोकणातील सिद्धेश गुरव हा विद्यार्थी अव्वल स्थानी अव्वल ठरला असून ही अभिमानास्पद बाब आहे. सिद्धेश गुरव यांच्या या उज्वल यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी.डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू,सर्व संस्था पदाधिकारी,प्रभारी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले डॉ. अनिल फराकटे, डॉ.एस.एन.पाटील, एनसीसी लेफ्टनंट डॉ.बाळू राठोड ,प्रा. जयश्री कसालकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सिद्धेश गुरवचे सुयश
