*⚡सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी तालुक्यात आज १५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात जुनाबाझार ३, न्यू खास्कील वाडा १, खास्कील वाडा १, न्यू सालई वाडा २, माठेवाडा १, तर ग्रामीण भागात सांगेली ५, वेत्ये १, मळेवाड १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ९४ रुग्ण सक्रिय आहेत.
