ठाणे सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याप्रकरणी कणकवली न.पं. कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन ​​

मुख्याधिकारी यांच्यासह कर्मचार्‍यांनी एकत्र येत केला हल्ल्याचा निषेध

*⚡​कणकवली ता.३१-:* ​ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटली तर त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला.​ ​या हल्ल्याचा निषेध कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे व कर्मचारी संघटनेकडून आज मंगळवारी करण्यात आला. तसेच या हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून मुख्याधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही छेडले. तसेच नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित हल्लेखोराला जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, कर्मचारी संघटनाचे किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, सतीश कांबळे, प्रियांका सोनसुरकर, अमोल भोगले, प्रितेश खैरे, ध्वजा उचले, निकिता पाटकर, माधुरी डगरे, अनंत कुबल, रुचिता ताम्हणकर, सुस्मिता सावंत, संदीप मुसळे, विभव करंदीकर, सचिन नेरकर, विनोद सावंत आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page