देवगड पोलीस निरीक्षक पदी निळकंठ बगळे यांची नियुक्ती;पदभार स्वीकारला
*⚡देवगड ता.३१-:* देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची प्रशासकीय बदली कुडाळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.देवगड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी निळकंठ गोपाळकृष्ण बगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.असून त्यांनी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचेकडून देवगडचा पदभार स्वीकारला आहे. काही महिन्यापूर्वीच फुलचंद मेंगडे यांच्या रूपाने देवगड पोलीस निरीक्षक पद स्वीकारला होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मागील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली होती.तसेच गोवा बनावटी दारू विक्रीला आळा घालण्याकरीता मोहीम राबविली होती.पोलीस निरीक्षक मेंगडे यांची कुडाळ येथे बदली झाल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी निळकंठ गोपाळकृष्ण बगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर पोलीस उपनिरीक्षक म्हणून शेखर दिनकर सावंत यांना देवगड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. देवगड पोलीस निरीक्षकपदी निळकंठ गोपाळकृष्ण बगळे यांनी नूतन पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नूतन पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी यापूर्वी ठाणे ग्रामीण,कोल्हापूर ,तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे येथे आपली सेवा बजावली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सुपुत्र आहेत. आता देवगडमध्ये अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून यावर कशा प्रकारे आळा नूतन पोलीस निरीक्षक घालतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. देवगड पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नीलकंठ बगळे यांची राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार शेठ घाटे यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम,उपसभापती रवी तिरलोटकर ,तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर व अन्य पदाधिकारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
