एन.सी.सी. कॅडेट रोहन कांबळी याचा खारेपाटण हायस्कुलच्यावतीने सत्कार

*⚡कणकवली ता.३१-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलचा इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणारा एनसीसी कॅडेट रोहन पुरुषोत्तम कांबळी याची नुकतीच पुणे येथे होणाऱ्या इंटर डायरेक्ट रायफल शुटिंग स्पर्धे करिता निवड झाली आहे. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे खारेपाटण हायस्कुलचावतीने त्याचा विशेष सत्कार खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,खारेपाटण शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश कोळसुलकर,संचालक राजेश वारंगे,खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक पी. ए. अकिवाटे,झुंझार मित्र मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष संकेत शेट्ये तसेच कॅडेट रोहन कांबळी यांचे आई वडील व शिक्षवृंद उपस्थित होते. कॅडेट रोहन कांबळी याने कोल्हापूर येथे झालेल्या रायफल शुटिंग स्पर्धेत नुकतेच यश संपादन केले होते.आता त्याची निवड पुणे येथे होणाऱ्या रायफल शुटिंग स्पर्धे करिता झाली आहे.या त्याच्या निवडी बद्दल खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी त्याचे पुष्पगुच्छ व रोख रकमेचे बक्षीस देऊन सत्कार केला व पुढील स्पर्धेकरिता त्याला शुभेच्छा दिल्या. खारेपाटण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष संजय देसाई,खारेपाटण हायस्कुल माजी विद्यार्थी व एनसीसी सार्जंट तस्निम पटेल,खारेपाटण कॉलेजचे प्राध्यापक अजय गुरसाळे,झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे अद्यक्ष संकेत शेट्ये आदी मान्यवरांनी एनसीसी कॅडेट रोहन कांबळी याला रोख रकमेचे बक्षीस देऊन त्याला शुभेच्छा दिल्या.या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हायस्कुलचे शिक्षक एम. के. मोटे यांनी मानले.

You cannot copy content of this page