*⚡कणकवली ता.३१-:* राष्ट्रीय हॉकीचे जादुगार भारतीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस तथा राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच खारेपाटण ज्युनिअर कॉलेज व खारेपाटण हायस्कुल येथे संयुक्तिकपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांची विशेष उपस्थिती होती.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,संस्थेचे सेक्रेटरी महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री आकिवाटे व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला सरपंच रमाकांत राऊत व संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. पाडवी यांनी केले होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे शिक्षक एम. के. मोटे यांनी मानले.
खारेपाटण ज्युनिअर कॉलेज व हायस्कुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
