नांदगावात आजोळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे होणार स्वागत

*⚡कणकवली ता.२७-:* केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायणराव राणेंचे नांदगाव येथे २८ आगस्ट रोजी सकाळी १० वा. त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.त्यांचे आजोळी असलेल्या नांदगाव येथे ही जंगी स्वागत करण्यासाठी नांदगाव तिठा येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली. ढोल ताशा पथक यांच्या व फटाक्यांची आतिषबाजीत जंगी स्वागत कासार्डे विभाग यांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे उपसभापती प्रकाश पारकर , भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर यांनी सांगितले आहे. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर,तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके,प्रसाद जाधव, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर ,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,तोडंवली उप सरपंच अशोक बोभाटे ,आयनल सरपंच बापू फाटक , योगेश सदडेकर ,कमलेश पाटील,राजू तांबे , आदी कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page