जनआशीर्वाद यात्रेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही:नाम.उदय सामंत ​​

*⚡​​कणकवली ता.२७-:* ​केंद्र सरकारकडून प्रथम डिझेलचे दर कधी कमी होणार तसेच गॅसचे दर कधी क​मी होणार हे येथील महिला भगिनींना जन आशीर्वाद यात्रेचा संकल्प करणाऱ्यांनी सांगितले पाहिजे. या जन आशीर्वाद यात्रेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही.असे देखील सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे प्रसार माध्यमांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद साधला. केंद्रियमंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून याच दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांचा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हात आले असता ,केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कोकणाला काय काय देणार आहेत? याची पहिली उत्तरे यात्रा काढणा​ऱ्यांनी जनतेला द्यावीत आणि मगच जनतेचा आशीर्वाद घ्यावा. अशी उपरोधिक टीका सिंधुदुर्ग ​जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग खारेपाटण चेक पोस्ट येथे प्रसारमाध्यमांशी​ संवाद साधताना केली. ​​

You cannot copy content of this page