*वागदे डंगळवाडी येथील घटना : एक जखमी
*💫कणकवली दि.१६-:* वागदे डंगळवाडी येथे धावत्या बोलेरो कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. बीडहुन कसाल येथे येत असता वागदे डंगळवाडी येथे गाडी आली असता गाडीचा टायर फुटून अपघात झाला. सुदैवाने रोड रेलिंगला गाडी अडकल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.