मालवणात भाजपा आक्रमक सामनाची केली होळी

जशात तसे उत्तर देण्याचा चिंदरकर यांचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी शिवसेना हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय… नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है… नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक व सुटकेच्या पार्श्वभूमीवर आक्रमक बनलेल्या मालवणातील भाजप कार्यकर्त्यानी आज सामना वृत्तपत्राची होळी करत सामना मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल छापून आलेल्या आक्षेपार्ह मजकुराचा निषेध व्यक्त केला. पंतप्रधानांबद्दल समानामधून खालच्या शब्दात टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत असून केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊन हिशेब चुकता केला जाईल असा आक्रमक इशारा यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक व सुटकेनंतर आज मालवण भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची होळी केली. सामना मध्ये पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल खालच्या शब्दात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्याच्या निषेधार्थ ही होळी करण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले. तसेच नारायण राणे यांच्या अटकेचा निषेधही यावेळी नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेना हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय… नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है… नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है… हम से जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा… नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्यसरकार व शिवसेनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सचिव महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जि प चे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, नगरसेवक गणेश कुशे, जगदीश गावकर, शहरप्रभारी विजय केनवडेकर, संतोष कोदे, संतोष गावकर, भाऊ सामंत, राजेश तांबे, दीपक सुर्वे, आबा हडकर, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, राजन माणगावकर, आतिक शेख, विजय निकम, संतोष कोदे, संतोष गावकर, प्रमोद घाडी, प्रशांत परब, रामचंद्र चोपडेकर, बाबू कासवकार, जॅक्सन लुद्रिक, डॉ. राऊळ, यासिन सय्यद, सुनील घाडीगावकर, प्रमोद घाडी, बबलू राऊत, अविनाश राऊत, सुशांत घाडीगावकर, प्रकाश कासले, तुषार हाटले, आबा पोखरणकर, संदीप भोजने, प्रियाल लोके, आबा हडकर, राजू आंबेरकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page