*पावशी येथील घटना, संबंधित तिघांवर गुन्हा दाखल
*💫कुडाळ दि.१५-:* लॉक डाऊन कालावधीत घराची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या महिलेने त्या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पावशी येथे घडली आहे.लॉक डाऊन काळात घराची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या महिलेने हे घर आपलेच असून, या घराशी तुमचा काहीही संबंध नाही. असे सांगत घरमालकाने लावलेले कुलूप तोडून त्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तसेच घरमालकाला शिवीगाळ करत त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर देखील धावून गेली होती. या प्रकरणी घर मालकाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित महिलेसह तिघांवर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पावशी मिटक्याचीवाडी येथे घडली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर त्या तिघांना पोलिसांनी दिलेली नोटीस देखील स्वीकारण्यास नकार देत पोलिसांशी हुज्जत घातली आहे. यावेळी पोलिसांनी दोन जणांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.