वेंगुर्ले शिवसेनेची तहसीलदारांना निवेदन
वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल व अभद्र वक्तव्ये करुन भारतीय घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय घटनेचा व महाराष्ट्र राज्य संस्कृती अवमान केला आहे. त्याबद्दल नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात होण्यासाठी वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने वेंगुर्ला तहसिलदार यांना आज निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना घटनेने सर्वोच्च स्थान दिले आहे. त्या अनुशंगानेच ते राज्याचा कारभार करीत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे संपूर्ण राज्याच्या सर्व नागरिकांचा अपमान होणारे व घटनेची पायमल्ली होणारे असे आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत व भारतीय दंडविधायक अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे असे नमुद केले आहे. यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, बाळा दळवी, शिवसेनेचे सचिन वालावलकर, विवेक आरोलकर, प्रकाश गडेकर, काशिनाथ नार्वेकर, संजय परब, उमेश नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
