केंद्रीय मंत्री राणेंवर गुन्हा दाखल करा

देवगड शिवसेनेची मागणी

*⚡देवगड ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केल्याबद्दल देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देवगड पोलीस स्टेशन निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचेकडे दिले. या निवेदनात , भारतीय जनता पक्षाची जन आशिर्वाद यात्रा महाराष्ट्रात चालू असून तो त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा राजकीय कार्यक्रम आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हयाचे सूक्ष्म लघु व मध्यम केंद्रीय उदयोग मंत्री नारायण राणे यांनी काल रायगड येथील पत्रकार परीषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तिथे असतो तर कानाखाली मारले असते अशी दादागिरीची धमकी वजा बेताल वक्तव्य केले असून नारायण राणेंनी स्वत: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असून कर्मधर्म संयोगाने आज केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या मुखातून हे वाक्य शोभा देत नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद हे संविधान पद असून नारायण राणे हे मागील दोन महीन्यांपासून बेजबाबदार बेताल वक्तव्य वारंवार उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांबाबत करीत आहेत. तरी आपण नारायण राणे यांच्या विरुध्द कायदयांतर्गत येणारे कलम लावून तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशा आशयाचे निवेदन देवगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक फूलचन्‍द्र मेंगडे यांच्याकडे मंगळवारी देण्यात आले तत्पूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी बेताल वक्त्यव केल्याबद्दल त्यांचा निषेध करून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांडून होणार असे पोलिसांना समजताच पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला .यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम उपतालुका प्रमुख रवींद्र जोगल , सुनील जाधव, बुवा तारी, विभाग प्रमुख तुषार पेडणेकर,शहरप्रमुख संतोष तारी ,संजय गावकर शरद लोके ,संदीप डोळकर राजीव वाळके,आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page