अमित शहांचा राणेंना फोन
*⚡मुंबई दि.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहेत. शिवसेना अशा पद्धतीने आक्रमक झालेली असताना भाजपाकडून नारायण राणे यांच्या समर्थनार्थ कोणी समोर आल्याचं दिसत नव्हतं. पण आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना फोन केला. नेमकं काय घडलं? ते सर्व त्यांच्याकडून समजून घेतलं व हम आपके साथ हैं असा शब्द दिला. त्यामुळे नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा थांबणार नसून ती सुरुच राहणार आहे. आता थेट अमित शहांनी नारायण राणेंची पाठराखण केल्यामुळे हा संघर्ष आता राणे विरुद्ध शिवसेना असा न राहता, केंद्र विरुद्ध राज्य होण्याची शक्यता आहे.
