*⚡कणकवली ता.२३-:* रक्षाबंधनच्या निमित्ताने नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि नगरपंचायत कणकवली, हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, समृद्धी वस्ती स्तर संघ टेंब वाडी कणकवली यांच्या संयुक्तपणे व्यसनमुक्ती शी बंधन|| व्यसनांपासून रक्षण||।हा अनोखा कार्यक्रम कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा ऊचले, हिरकणी केंद्राच्या व्यवस्थापक सीमा गावडे, क्षेत्रीय समन्वयक सिद्धी नलावडे, सहयोगीनी स्नेहा कदम,समृद्धी वस्ती स्थर संघाच्या अध्यक्ष सुचिता पालन ,खजिनदार स्वाती राणे, सदस्य स्मिता जोगळे, स्नेहल सावंत, सुप्रिया साटम, माधुरी मांडवकर, रसिका, प्रियांका, सुवर्णा आरोलकर, माऊली वस्ती माऊली वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा साळगावकर, सचिव मंगल सावंत, नवदुर्गा वस्ती तर संघाच्या अध्यक्ष प्रिया सडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वच्छता दूत(स्वच्छता कर्मचारी) यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यामुळेच आपण स्वच्छ सुंदर कणकवलीचे चित्र पाहू शकतो. तसेच आज समाजामध्ये वाढती व्यसनाधीनता सर्वांच्या चिंतेची बाब ठरत आहे. या स्वच्छता दूतांनी शहर स्वच्छतेबरोबर शहरातील व्यसनाधीनतेची ही सफाई केली तरच येणारी पिढी निर्व्यसनी होईल असे मत व्यक्त केले. यावेळी नशाबंदी मंडळाच्या समन्वयक अर्पिता मुंबरकर यांनी कणकवली नगरपंचायतीचे स्वच्छता दूत कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा वारसा जपत आहेत. असे विचार व्यक्त करून सर्वांना व्यसनमुक्तीचा संकल्प दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक अमोल भोगले यांनी केले तर आभार प्रदर्शन हिरकणी केंद्राच्या व्यवस्थापक सीमा गावडे यांनी केले.
कोकण गांधींच्या स्वच्छतेचा वारसा जपणाऱ्या स्वच्छता दूतांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प
