*⚡सावंतवाडी ता.२३-:* भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस स्टेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे. सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच या माध्यमातून झाडे लावणे व ती जगवणे किती महत्त्वाचे आहे. हे पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सरचिटणीस मेघना साळगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, मिसबा शेख, परिणीती वर्तक, सविता टोपले, शुभदा सावंत, ज्योती मुद्राळे, अदिती दळवी, अंतरा ढवळे आदी महिला उपस्थिती होत्या.
भाजप महिला मोर्चाकडून पोलिस आणि वन अधिकाऱ्यांना रक्षाबंधन
