केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्यदिव्यतेने स्वागत करणार

आचरा,आडवली मालडी,मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप पदाधिकारयांचा निर्धार;स्वागत स्टेज कामाचा शुभारंभ

*⚡मालवण ता.२३-:* जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या केंद्रीय लघू सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा आचरा येथे भव्य दिव्यतेने स्वागत करण्याचा निर्धार आचरा ,आडवली, मसूरे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यानी केला असून या दृष्टीने स्वागत स्टेज कामाचा शुभारंभ जेष्ठ भाजप कार्यकर्ते विलास हडकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस संतोष कोदे,हडी सरपंच महेश मांजरेकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे,अशोक बागवे,मंगेश टेमकर,संतोष गांवकर,चंदू सावंत, शेखर कांबळी,दत्ता वराडकर, संजय लोके,मनोज हडकर, सुनील खरात, आशिष पाटील, किशोर त्रिंबककर, बाबू बाईत, बाणे यांसह अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. स्वागत नियोजनाबाबत माहिती देताना भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी मालवण तालुक्याच्या प्रवेशद्वार असलेल्या आचरा पारवाडी पुलापासून आचरा तिठा पर्यंत भव्य मोटासायकल रँली काढण्यात येणार आहे. यानंतर आचरा, आडवली, मसुरे मतदार संघातील विविध सामाजिक संस्थांतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तरी लोकनेते नारायण राणे यांच्या या स्वागत सोहळ्यास सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन चिंदरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page