करुळ -जामदारवाडी येथील अपघातामधील मयत संदिप पाटील कुटूंबियांना 35 लाखाची भरपाई देण्याचा आदेश

*⚡कणकवली ता.२३-:* कोल्हापूर तळेरे रस्त्यावरील वैभववाडी – करुळ – जामदारवाडी येथे 8 मे 2016 रोजी झालेल्या अपघातामधील मयत संदिप प्रदिप पाटील यांच्या नातेवाईकांना 35 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा सिंधुदुर्ग येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रधान न्यायाधिश श्री.शि.व.हांडे यांनी आदेश दिला आहे.सदर कामी अर्जदारांचेवतीने अॅड . प्रकाश राजाराम पावसकर यांनी काम पाहिले. सदरचा अपघात हा दिनांक 8 मे 2016 रोजी कोल्हापूर -तळेरे रस्त्यावरील वैभववाडी – करुळ – जामदारवाडी येथे झाला होता . अपघातामधील मयत संदिप प्रदिप पाटील हे करुळ येथील आपल्या घरी मोटर सायकलने येत होते तर अपघातामधील टाटा ट्रक क्रमांक एम 08 एलटी 4849 तळेरे कडून कोल्हापूरच्या दिशेन जात होता. करुळ जामदारवाडी येथे दोन्ही वाहने आली असता ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील एम 08 एलटी 4849 भरधाव वेगात चुकीच्या साईडला अतिवेगाने व निष्काळजीपणाने चालविल्यामुळे दोन्ही वाहनांची ठोकर होवून ट्रकचालकाने अपघात केला होता व तो पळून जात असता काही अंतरावरवर जावून पलटी झालेला होता . अपघातामधील मोटर सायकलस्वार संदिप पाटील हे जाग्यावरच मयत झालेले होते . अपघातानंतर संदिप पाटील यांचे वारस पत्नी , दोन अज्ञान मुले, आई व वडील यांनी सिंधुदुर्ग येथील मोटार अपघात न्यायाधिकरणात 29 ,80,000 / – नुकसान भरपाई मिळावी म्हणून टाटा ट्रक चालक व मालक व विमा कंपनी एस. बी.आय जनरल इश्यूरन्स कंपनी यांचेविरोधात दावा दाखल केला होता . सदरचा दावा सिंधुदुर्ग येथील प्रधान न्यायाधिश श्री शि. व. हांडे यांचेसमोर चालून न्यायालयाने प्रथम विमा कंपनी आणि 23,83,750/ – तसेच दावा दाखल तारीख 26 ऑगस्ट 2016 पासून 9 टक्के व्याज व दाव्याचा संपूर्ण खर्च मिळून 35 लाख रुपये नुकसान भरपाई अर्जदार यांना समप्रमाणात देण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे . सदर कामी अर्जदारांचे वतीने अॅड . प्रकाश राजाराम पावसकर कणकवली यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page