*⚡मालवण ता.२२-:* मालवण बंदर जेठी येथे मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्यावतीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महासाथ रोगाच्या अटी शर्थीचे पालन करत नारळी पौर्णिमा निमित्त महिलांसाठी ची नारळ लढवणे स्पर्धा रद्द करून सामाजिक बांधिलकी जोपासत आज सायंकाळी या उत्सवात सहभागी झालेल्यांना मास्क वाटप करण्यात आले गेल्या दीड वर्षा पासून कोविड १९ या कोरोना संसर्गजन्य साथीचा प्रसार होत असतानाच त्याला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे या प्रयत्नांना साथ म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत मालवणच्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्यावतीने बंदर जेठी येथे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना विशेषतः महिलांना मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते मास्क वाटपास सुरवात करून सुरक्षित अंतर ठेवत व सॅनिटायझर हातावर घेऊन मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर, अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे, फेलीस फर्नांडिस, गणेश पाडगावकर , विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, ममता तळगावकर, योगेश्वर कुरले, चारुशीला आचरेकर, कल्पना मेथर, सरदार ताजर, ऍड. अमृता अरविंद मोंडकर आदी व इतर उपस्थित होते
नारळी पौर्णिमा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मास्क वाटप
