एलसीबी व बांदा पोलीसांची दारू कारवाई

बेकायदा दारुसह तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

*⚡बांदा दि.२२-:* बांद्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग व बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात वेगवेगळया कारवाया केल्या. बांदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लाख ५४ हजार १९२ रूपयांचा तर एलसीबीने केलेल्या कारवाईत १० लाख ८८ हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने फकीरफाटा डोंगरपाल मार्गावर चोरट्या मार्गाने केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली. दुसरी कारवाई इन्सुली चेक पोस्टवर बांदा पोलिसांनी केली.

You cannot copy content of this page