बाहेरचावाडा जलाल शहा पीर येथे मोहरमची सांगता

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मोहरमनिमित्त जलालशहा पीरचे घेतले दर्शन

*⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी बाहेरचावाडा जलालशहा पीर येथे मोहरम निमित्त पतवांची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मोहरम निमित्त जलालशहा पीरचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर शहरातील इतर पीराचेही त्यांनी दर्शन घेतले. हसन-हुसेन यांची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधव एकत्र येतात. हिंदू बांधवही या पीराच्या दर्शनासाठी येतात. या सणातून हिंदू-मुस्लिम ऐक्य जपले जाते असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज मुस्लिम बांधवांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक राजू बेग, मुजीब शेख, तौकीर शेख, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, याकुब शेख, अर्षद बेग, असिफ ख्वाजा यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page