वैभववाडी प्रतिनिधी नाधवडे ग्राम विकास मंडळ, मुंबईच्या स्थानिक समितीचे माजी अध्यक्ष आणि नवजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त, नाधवंडे गाव प्रमुख गोविंद कृष्णाजी उर्फ बाळातात्या कुडतरकर वय ७७ यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. गोविंद कुडतरकर हे गावात बाळा या टोपण नावाने परिचित होते, तरी सर्वजन त्यांना तात्या या आदरार्थी नावाने संबोधित असत.मुंबईमध्ये माध्यमिक विध्यालयात लिपिक पदावर त्यांनी सेवा केली होती. अत्यंत संयमी असणारे बाळातात्या नाधवडे गावातील कठिण विषयही सहजरित्या हाताळत असत. एक महिन्यापासून त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतु त्यांच्या शरीराने औषध उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चातत पत्नी, दोन मुलगे,सुना नातवंडे असा परिवार आहे. तात्यांच्या आकस्मिक निधनाने नाधवडे गावावर शोककळा पसरली आहे.
गोविंद कुडतरकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
