खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*⚡सावंतवाडी ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन द्वारे आज १६ वर्षाखालील निवड चाचणी घेण्यात आली. या निवड सत्रामध्ये जिल्ह्यातील एकूण ६५ क्रिकेट पटूनी सहभाग घेतला होता.व त्या पैकी ४०क्रिकेट पटुंची प्रथम फेरीत निवड करण्यात आली.सत्राचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक श्री. राजन आंगणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी श्री. राजन आंगणे, नगरसेवक अँड. परिमल नाईक, असोसिएशन पदाधिकारी अँड. राजन नाईक यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून सर्व सहभागी क्रीडापटूना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक उदयफ नाईक, बाळ चोडणकर, रघु धारणकर,बाळा मडगांवकर,बाबल्या दुभाषी, राहुल रेगे, राजू डोंगरे,सी. ए नाईक, महेश भाट आदी असोसिएशनचे पदाधिकारी व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
