शिक्षक समिती बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा कटिबद्ध:भाई चव्हाण

आचरे येथील केंद्रशाळा आचरे नं.१ येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव

*⚡मालवण दि२२-:* शिक्षक समिती जशी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक आहे तशीच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा कटिबद्ध आहे आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून समाजासमोर आदर्शवत काम केले आहे असे प्रतिपादन शिक्षक नेते भाई चव्हाण यांनी येथे बोलताना केले आचरे येथील केंद्रशाळा आचरे नं.१ येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवणच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल कथाकथन, हस्ताक्षर स्पर्धा तसेच इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी तील शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.परमानंद वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर म. रा. प्रा. शि. समिती चे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन कदम, मालवण तालुका अध्यक्ष श्री. परमानंद वेंगुर्लेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. भाई चव्हाण,सचिव श्री. नवनाथ भोळे, कार्याध्यक्ष श्री. रुपेश गरुड,स्पर्धा प्रायोजक केंद्रप्रमुख श्री. श्रीकृष्ण सावंत,शिक्षक नेते श्री. मंगेश कांबळी,मालवण शिक्षक पतपेढी संचालक श्री. राजेंद्रप्रसाद गाड,जिल्हासंघटक श्री. विनोद कदम, श्री. झाडे, श्री.असरोंडकर आचरे केंद्रप्रमुख श्रीम. सुगंधा गुरव, मुख्याध्यापक केंद्रशाळा आचरे नं १. श्रीम. जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.परमानंद वेंगुर्लेकर यांनी संघटना विद्यार्थी, शिक्षण,शिक्षक यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध आहे असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन कदम ,शिक्षक नेते श्री.मंगेश कांबळी यांची समयोचित भाषणे झाली यावेळी आदर्श शिक्षक श्री. राजन जोशी सर (शाळा चिंदर बाजार ) यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नवनाथ भोळे यांनी केले. तर.राज खानेकर यांनी सूत्रसंचालन केले. तसेच आभार यशवंतराव पाटील यांनी मानले यावेळी शिक्षक वर्ग, पालक वर्ग, गुणवंत विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page