डॉ कुबेर यांच्या पार्किंग केलेल्या वाहनाला लागली आग

रात्री पावणे बारा वाजता घडली घटना;मोठे आर्थिक नुकसान

मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

*⚡मालवण ता.२२-:* चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानी पार्किंग करून ठेवलेल्या डॉ. कुबेर मिठारी यांच्या कारला शनिवारी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. श्री. मिठारी आणि ग्रामस्थांनी वेळीच आग विझविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत डॉ. मिठारी यांनी रविवारी सकाळी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, डॉ. मिठारी राहत असलेल्या चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथील निवासस्थानी त्यांनी आपली कार MH 09 EG 1230 ही पार्कींग करून ठेवली होती. शनिवारी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फटाक्यांसारखा मोठा आवाज झाला. त्यामुळे डॉ मिठारी यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता. त्यांच्या कारने पेट घेतल्याचे दिसून आले. डॉ मिठारी यांच्या कुटूंबियांनी आरडाओरड केली असता शेजारी राहत असलेले डॉ प्रणव पोळ, तसेच ग्रामस्थ संजय गावडे, मंदार गावडे , सिद्धेश गावडे, तसेच इतर रहिवाशी धावून आले. पाणी व अन्य साधनाचा वापर करून आग विझविण्यात आली. मात्र कारचे इंजिन व अन्य यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान याप्रकरणी डॉ मिठारी यांनी रविवारी सकाळी मालवण पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. शॉर्ट सर्किटने कारने पेट घेतला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

You cannot copy content of this page