*⚡सावंतवाडी ता.२१-:* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे १६ वर्षाखालील मुलांची निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवडीसाठी सावंतवाडी येथे २२ ऑगस्टला निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी सकाळी साडेआठ वाजता खासकीलवाडा येथील ऐम्स क्रिकेट ॲकॅडमी येथे होणार असून, खेळाडूंनी क्रिकेटच साहित्य व आधार कार्ड घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक उदय नाईक, राहुल रेगे व सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
१६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेटसाठी २२ रोजी संघ निवड चाचणी
