कणकवलीतील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू

*⚡कणकवली ता.२१-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लेनला तडे गेले होते मात्र तात्पुरती डागडुजी करीत अखेर या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ब्रिज वरील रस्त्यास मागील महिन्यात तडे गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता हे तडे तात्पुरत्या स्वरूपात भरून ब्रिजवरील दुसऱ्या बाजूचीही वाहतूक शनिवारी सायंकाळी 5 नंतर सुरू करण्यात आली आहे. कणकवली शहरातील ओव्हर ब्रिज हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळेच मागील महिन्यात या ब्रिजवरील रस्त्यात मोठे तडे जाऊन भेगा पडल्या होत्या. त्यावेळी कणकवलीवासीयांनी हायवे ठेकेदार व बांधकाम विभागाच्या निदर्शनास हे निकृष्ट काम आणून दिल्यानंतर काही दिवसांसाठी हा ब्रिज वाहतुकीस बंद करून डागडुजी करण्यात आली पण डागडुजी देखील तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने अजूनही काही ठिकाणी या ब्रिजला तडे गेल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली असली तरी पुलाच्या कायमस्वरूपी डागडुजीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

You cannot copy content of this page