वाहतुकीचे निमय यावर गुगल वेबिनारद्वारे मार्गदर्शन

*⚡वेंगुर्ला ता.२१-:* तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका वकिल संघटना, वेंगुर्ला यांच्य संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट रोजी वाहतुकीचे नियम यावर गुगलवेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पी.एस.आय.विनायक केसरकर व पोलिस कॉन्स्टेबल एस.डी.परुळेकर यांनी वाहतुकीच्या नियमाबांबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्य वकील, न्यायालयीन कर्मचारी, तालुका विधी सेवा वकील पॅरा लिगल व्हॉलेंटीअर्स व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अॅड.सायली चव्हाण यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील यांचे सहकार्य लाभले. फोटोओळी – वाहतुकीचे नियम यावर पी.एस.आय.विनायक केसरकर व पोलिस कॉन्स्टेबल एस.डी.परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page