राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आमदार शेखर निकम यांचे जंगी स्वागत

*⚡सावंतवाडी ता.२१-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांचे कुडाळ येथे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी जंगी स्वागत केले. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आज अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर होणार आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, सुरेश गवस, अबिद नाईक, व्हीक्टर डॉन्टस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, बावतीस फर्नांडिस, आशिष कदम, नंदन साटेलकर, अशोक पवार, इफ्तिकार राजगुरू, शैलेश लाड, राजू धारपवार, प्रसाद दळवी, अस्लम खतिब, आगोस्तीन फर्नांडिस, संतोष जोईल, जावेद शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page