बाळासाहेबांचे स्मारकावर कोणीही नतमस्तक होऊ शकतो

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले मत

*⚡सावंतवाडी दि.१९-:* बाळासाहेबांचे स्मारक हे राष्ट्रीय स्मारक आहे. ते एक मोठे नेते होते. त्यांच्या स्मारकावर कोणीही नतमस्तक होऊ शकतो. त्यांच्या दर्शना वरून वाद करणे योग्य नाही, त्यामुळे असे वाद निर्माण करून त्यांना लहान करू नका, असे मत माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते बबन साळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले. या प्रसिद्धीपत्रकात साळगावकर यांनी म्हटले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे दर्शनासाठी गेले होते यावरून शिवसेना भाजपात कलगीतुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. साळगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, बाळासाहेबांना लहान करू नका. प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत. मग तो छोटा शिवसैनिक असो किंवा मोठा शिवसैनिक त्यामुळे अशा या विषयावरून राजकारण होणे दुर्दैवी आहे.

You cannot copy content of this page