जिल्ह्यात आता टेबल टेनिसचा होणार प्रसार

महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनची सिंधुदुर्गात शाखा स्थापन

*⚡मालवण ता.१९-:* जिल्ह्यात टेबल टेनिसचा प्रचार व प्रसार होण्यासाठी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी विष्णू कोरगावकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष किरण पिंगुळकर (कुडाळ), सचिव हेमंत बालकर (मालवण), सहसचिव दीपक जाधव (वैभववाडी), खजिनदार नितीन तळेकर (कणकवली), सदस्य सुरेंद्र चव्हाण (देवगड), शुभम मुळीक (सावंतवाडी). विष्णू कोरगावकर म्हणाले, जिल्हयात टेबल टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. या खेळाडूंना ‘जिल्ह्यातील तज्ज्ञ तसेच आजी-माजी खेळाडूंकडून टेबल टेनिसबाबत प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सातत्याने मिळत आहे. यामुळे विभागीय व राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील नवोदित खेळांडूची कामगिरी सातत्याने उंचावत आहे. राज्यस्तरावर टेबल टेनिस खेळासाठी चांगले काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनशी समन्वय साधत जिल्ह्यातील नवोदित तसेच होतकरू खेळाडूना विभागीय, राज्य तसेच देशपाळीवरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, मोठ्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी जिल्हयात प्रशिक्षण तसेच सातत्याने स्पर्धांचे आयोजन करणे तसेच स्थानिक पातळीवर खेळासाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थेची नेहमीच गरज असते. जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून हे काम पूर्वी होत होते. मात्र, गेली अनेक वर्ष ही संस्था कार्यरत नाही, त्यामुळे जिल्ह्यात मुला मुलींसाठी टेबल टेनिस प्रशिक्षण तसेच तसेच स्पर्धेचे आयोजन करणे, जिल्ह्यातील मुलांना विभागीय राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेताना तांत्रिक अडचणी येतात. राज्य असोसिएशनचे कोकण विभागप्रमुख संजय कडू यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील मुलांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत असू, मात्र, सातत्याने येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि आजी माजी टेबल टेनिसप्रेमींनी एकत्र येऊन महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनच्या जिल्हा शाखेची स्थापना केली आहे, असे कोरगावकर म्हणाले.

You cannot copy content of this page