राज्यातील दीड लाख लोक मरावे म्हणून नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा

सेनेचे खा विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

*⚡सावंतवाडी ता.१९ प्रसन्न गोंदावळे-:* महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक मरावे असे दिल्लीच्या भाजप राज्यकर्त्यांना वाटत असून, त्यामुळेच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोरोना वाढवण्याचं पाप तसेच कोरोना नियमाचा भंग खासदार नारायण राणे करत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलताना केला आहे.तसेच ते बोलताना पुढे म्हणाले, देशासमोर मोठी आव्हाने आहेत. ती आव्हाने सोडवण्या ऐवजी मुखदर्शन करत नवीन मंत्री फिरत आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. प्रमोद जठार हे या जिल्ह्यातील दलाल असून, त्यांची दखल घेण्याची आपणाला गरज नाही अशी टीका विनायक राऊत यांनी प्रमोद जठार यांच्यावर केली आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला काहीही फरक पडत नाही. कोणत्याही प्रकारचा धोका या यात्रेमुळे महाविकास आघाडी सरकारला निर्माण होईल असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. त्यांचा भ्रम निरासच होईल. ही पाच वर्ष पूर्ण करून पुढील पाच वर्ष देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील. भाजपने दिल्लीत बसून, देश अधोगतीला नेण्याचा प्रयत्न केला आहे. महागाई वाढ, पेट्रोल डिझेल चे वाढलेले दर, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आंदोलन, या सर्व बाबींमुळे केंद्र सरकार स्पेशल अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशातील लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यामुळे नारायण राणे यांना शिवस्मृती स्थळाचे दर्शन घेणे शक्य झाले आहे. यावेळी आमदार दिपक केसरकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page