पदराआडूनच नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन दर्शन घेतले

खासदार विनायक राऊत यांचा टोला

*⚡सावंतवाडी ता.१९-:* पर्यटन स्थळावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची मागणी आहे. असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या पदराआडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन दर्शन घेतले. असे खासदार राऊत यांनी सांगितले. आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयांमध्ये शिवसेना पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते. खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरू व्हावीत ही मागणी रास्त आहे त्याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे. तसेच पर्यटन स्थळावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची भूमिका आहे. माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी निर्माण केलेला चांदा ते बांदा मधील पर्यटन पॅटर्न योजना चालना मिळावी म्हणून देखील आमचे प्रयत्न आहेत. यावेळी आमदार दीपक केसरकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page