पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
*⚡सावंतवाडी ता.१८-:* येथे वनविभागात नवीन नियुक्त झालेले वनक्षेत्रपाल क्षिरसागर यांची आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी तालुक्यातील महत्वाच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील होणारी अवैद्य कामं बंद व्हावीत, तसेच अवैध लाकूडतोड बंद व्हावी, जंगली प्राण्यांचे सर्वतोपरी संरक्षण व्हावे, जंगलातील अवैध शिकार करणाऱ्यांवर नजर ठेवून योग्य ती कारवाई करावी, सावंतवाडी तालुक्यातील निसर्ग आणि नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व्हावे अशी विनंती मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकार्यांकडे केली. वनाधिकारी श्री. क्षिरसागर यांनी शुभेच्छा स्विकारत तालुक्यातील योग्य पद्धतीने काम होईल, तसेच आपण दिलेल्या माहितीचा वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष श्री.आशिष सुभेदार, नाना सावंत, देवेंद्र कदम, ऋग्वेद सावंत, मंगेश वरक प्रसाद परब आणि दिनार तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.
