देवगड पंचायत समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार
*⚡देवगड ता.१८-:* देवगड पंचायत समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच विजयदुर्ग किल्ला येथे 153 वा हेलियम डे साजरा करण्यात आला. covid-19 चे सर्व नियम पाळून हा हेलियम दिन शांततेत घेण्यात आला. हेडियम डेच्या निमित्ताने विजयदुर्ग किल्ला येथील साहेबांचे ओठे याठिकाणी झंडूच्या फुलांनी सजावट केली होती. सभापती लक्ष्मण (रवी)पाळेकर उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,सरपंच प्रसाद देवधर यांच्या हस्ते पुष्पहार घालून व जय जवान जय किसान जय विज्ञान जय विज्ञानच्या घोषणा देत हेलियम वायूचा 153 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हेलियम विषयी माहिती देत जनजागृती केली. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस आरिफ बगदादी, बाळा खडपे, प्रदीप साखरकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, पंचायत समिती सदस्य डॉ अमोल तेली, उपसरपंच महेश बिडिये, माजी सभापती सुनील पारकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष संजना आळवे, पंचायत समिती समिती सदस्या सौ शुभा कदम, निकिता कदम, जयश्री आडीवरेकर,भाजपा शहराध्यक्ष योगेश पाटकर, गीता लळीत, ग्रेसिस फर्नांडिस, सुरेश सावंत, शितल देऊळकर ,सुनील सारंग, मोंड सरपंच तिर्लोटकर ,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
