सविस्तर माहिती दिल्याशिवाय काम सुरू करू नये;चंदन मेस्त्री
*⚡देवगड ता.१८-:* मुणगेकर नगरी आनंदवाडी रस्ता काम ठेकेदारानें सुरू करूनही अजूनही अर्धवट स्थितीत आहे.प्रसंगी एक ते दिड फूट उंचीची काँक्रीटचे भिंत उभी आहे.सद्यस्थितीत रस्त्यात मोठमोठे दगड व माती टाकली असून असून रहदारीला अडथळा होत आहे.या रस्त्याचे खडीकरण अथवा डांबरीकरण झाले असेल तर ते निकृष्ट दर्जाचे आहे.त्यांची नोंद अंदाजपत्रकात असेल तर त्या मक्तेदाराला बिल अदा करण्यात येऊन तसेच कामाची सविस्तर माहिती दिल्या शिवाय काम सुरू करू नये अन्यथा ते काम बंद करण्यात येईल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत याना दिला आहे. यावेळी तालुका सचिव जगदीश जाधव,उपाध्यक्ष राजा मोंडकर महेश नलावडे,शहर अध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते.
