कणकवलीत उड्डाण पुलाच्या अपुऱ्या कामामुळे अपघात घडला तर जबाबदारी घेणार कोण ?

कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने सवाल

*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली शहरात ज्यादिवशीपासुन उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुले केले, त्या दिवशीपासुन काही ना काही घडतेय. अनेक पक्षांनी अनेक निवेदने दिली,पण याची आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही. यामुळे आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की, उड्डाण पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत , तसेच जाणवलीपासूनचे उड्डाण पुल खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद केले आहे .आगामी गणेश चतुर्थी उत्सवात वहातूक करायची कशी ? एकतर्फी मार्ग सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी होणारच … अशातच अपघात घडलाच आणि जिवीत हानी झालीच , तर याची जबाबदारी घेणार कोण ? असा सवाल कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे याबाबतचे निवेदन तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी सादर केले. राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,निलेश तेली ,बंटी मेस्त्री, प्रवीण वरूणकर ,सौ . गौरी महेश तेली ,महेश तेली,अमृता जिलेश मालंडकर, निलेश मालंडकर ,परेश एकावडे ,अक्षय घाडीगावकर व कणकवली तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे निवेदन निवेदन दिले. कणकवली शहरातील सर्व्हिस रोडच्या बाजूने अजुनही गटारे अर्धवट स्थितीत आहेत तसेच काही ठिकाणी गटारांचे बांधकाम कोसळले आहे . तसेच गटारांच्यावरच पादचारी व्यवस्था केलेली आहे , पण ती लोकांना चालण्यासाठी आहे की मोटरसायकल पार्कीगसाठी आहे, तसेच दुकानांचे बोर्ड लावण्यासाठी आहे का ?असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.आम्ही चालायचे कुठुन आणि म्हणुनच जनता रस्त्याचा वापर चालण्यासाठी करत आहे . एकतर तुमचा सर्व्हिस रोड मोठ्या गाड्या जाण्या लायकदेखील नाही. मग येणाऱ्या श्री . गणेश चतुर्थी उत्सवात घाई गडबडीत जर एखाद्याच्या हातुन अपघात घडलाच आणि यात जीवित हानी झाली , तर याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला आहे .याबाबतचे निवेदन कणकवली तहसीलदार ,कणकवली पोलिस स्टेशन व कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले.

You cannot copy content of this page