काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली ना.सतेज पाटील यांची भेट

*⚡कणकवली ता.१७-:* सिंधूदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संपर्क प्रमुख व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची कणकवली तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या समवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर व पदाधिकारी यांनी गोकुळ दुध संघाच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कोल्हापूर येथील सल्लागार किसनराव फडतरे व कोल्हापूर मधील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढीसाठी सहकार्य करण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page