मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय अधिक्षकांची भेट
*⚡सावंतवाडी ता.१७-:* उपजिल्हारुग्णालयात आवश्यक भूलतन्य उपलब्ध नसल्याने व जे एकमेव नियुक्त भूलतन्य आहेत ते रजेवर गेल्याने या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या रुग्णाची होत असलेली आर्पथिक रवड तात्काळ थांबावी या साठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांची भेट घेतली. तसेच या प्रश्नी जिल्हा सिव्हिल सर्जन यांची देखील उद्या भेट घेवुन यावर तात्काळ तोडगा न निघाल्यास जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी मनसेचे माजी उपजिल्हाअध्यक्ष अँड.अनिल केसरकर, परिवहन सेनेचे जिल्हाअध्यक्ष अँड.राजू कासकर , तालुका सचिव विठ्ठल गावडे,तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, संतोष भैरवकर,विभागअध्यक्ष नाना सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते
