धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
*⚡वेंगुर्ले ता.१६-:* आरवली सोंसुरे येथील सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांचा ९० वा वाढदिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनादी सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्था आरवली सोंसूरे येथील धर्म क्षेत्राचे संस्थापक सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली दुपारी महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर गावातील सरपंच व दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी व मांगेली येथील सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षी दोडामार्ग तालुक्यातील अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्तींना बालदत्तनाथ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश चतुर्थी साठी आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यामध्ये वासुदेव आप्पा सावंत घोटगेवाडी , शिल्पा लक्ष्मण तुळसकर घोटगेवाडी, संतोषी संतोष नाईक मांगेली, प्रमिला दत्ताराम गवस मांगेली, शिवराज बाबुराव लोंढे कोनाळकट्टा यांना गणेश चतुर्थी उत्सवासाठीआर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच मांगेली सरपंच विश्वनाथ गवस व घोटगेवाडी ग्रामपंचायत सदस्य स्नेहा तुळसकर यांचा सत्कार करण्यात आला. आरवली येथील वीज कर्मचारी यांचा अपघात होऊन दुखापत झाल्याने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच इतरही कुटुंबांना आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम स्थळी दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील इच्छा शाबी तुळसकर या दहा वर्षाच्या मुलीने उत्कृष्ट वकृत्व सादर केल्याने तिचा यथोचित शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनादि स्वयम् ब्रह्मपुरी पुण्यभुमी सुवर्ण क्षेत्र आरवली या संस्थेचे क्षेत्रधिकारी शिवचैतन्य आजोबा, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे, आरवली सरपंच तातोबा कुडव, आरवली ग्रामपंचायत सदस्य सोनाली कुडव, मांगेली सरपंच विश्वनाथ गवस, कोनाळकट्टा ग्रामपंचायतच्या स्नेहा तुळसकर, जय भोसले, विठ्ठल देसाई, दोडामार्ग तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर, यदुभाई चिपकर, सुरेश चिपकर, आणि चिपकर कुटुंबीय, संस्थेचे अध्यक्ष अनंत मगर आणि मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला असून अतिशय गरीब आणि गरजवंत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील काही गरीब कुटुंबांला गणेश चतुर्थी उत्सवासाठी आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूचे त्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अनिल राणे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेबद्दल ची आपुलकी व संस्थेचे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमाबद्दल तसेच जिल्ह्यातील एकमेव संस्था अनादी संस्था असून गोरगरीब जनतेच्या कायमच पाठीमागे असून त्यांना आर्थिक आधार देणारी ही एकमेव संस्था असल्याचे सांगितलेगोरगरीब जनतेपर्यंत पूरग्रस्तांना पर्यंत तसेच विविध अडचणीवर अडचणीला धावून जाणारी संस्थेचे पदाधिकारी आणि भक्तगण असून ते कुठलेही ्रकारची तमा न बाळगता आपला जीव धोक्यात घालून दुसर्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असतात या संस्थेचे कार्य हे खूप मोठे असून यापुढेही संस्थेचे कार्य मोठे व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली, शाबी तुळसकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचणारी संस्था म्हणजे शिवचैतन्य आजोबा यांची आहे या संस्थेचे कार्य महान असून सर्वत्र नावारूपाला आलेली संस्था आहे यापुढेही संस्थेचे कार्य असेच चालू ठेवावे असेही त्यांनी मनोगतात म्हटले आहे., विश्वनाथ गवस म्हणाले की या क्षेत्रावर येण्याचा मान पहिल्यांदा मिळाला इथे आल्यानंतर हे क्षेत्र बघून आपल्याला गहिवरून आले या संस्थे सारखे कार्य आपण कधीही आणि कुठेही बघितलेले नाही या संस्थेची गोरगरिबांसाठी गरजूंसाठी असलेली तळमळ घरातल्या कुटुंबासारखी आहे या संस्थेने केलेला आपला सन्मान कधीही विसरणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले, जय भोसलेयांनी मनोगत व्यक्त करून संस्थेबद्दल आदर व्यक्त केला तसेच त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले, इच्छा तुळसकरया दहा वर्षाच्या मुलीने मनोगत व्यक्त करताना सर्व उपस्थित भक्तगणांचे मने जिंकली तिचा आवाज आणि वकृत्व उत्तम असल्याने तिचा संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला, तातोबा कुडवयांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आभार व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमाबद्दल संस्थेला धन्यवाद दिले. आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व
