खास. विनायक राऊत यांची हरकुळ खुर्द ग्रा.पं.ला भेट

गावातील विविध विकासकामांबद्दल केली चर्चा

*⚡कणकवली ता.१६-:* रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खास. विनायक राऊत यांनी हरकुळ खुर्द ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली. यावेळी हरकुळ खुर्द गावातील विविध विकासकामांबद्दल चर्चा केली. तसेच हरकुळ खुर्द गावातील शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, माजी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, पं. स. मंगेश सावंत, विभागप्रमुख बंड्या रासम, नगरसेवक सुशांत नाईक , सरपंच विदिशा तेली, उपसरपंच संजय रावले, संदेश पटेल, हर्षद गावडे, आबु पटेल, सचिन सावंत, महेंद्र डीचवलकर, विलास रासम, ग्रा.पं. सदस्य नारायण राणे, अविनाश रासम, रुपेश कुबल, उमेश घाडी, संतोष जाधव, हेमंत सावंत, विठ्ठल तेली, समीर सावंत, कांता दळवी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page