सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एसीच काम पुर्ण

देव्या सूर्याजी व मंगेश तळवणेकर यांच्या पाठपुराव्याला यश

*⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एसीच काम पुर्ण झाल असून डायलिसिस रुम, दरवाजाच काम अंतिम टप्प्यात आल आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पाठपुरावा केला होता. कोरोनामुळे तालुक्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग सिंधुदुर्ग आणि वैद्यकीय प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत दुरावस्था निर्माण झाल्या होत्या. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह रक्तदात्यांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. रक्तपेढीतील या रूममध्ये वातानुकूलित वातावरण असण आवश्यक असताना प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ब्लड डोनेट रूम, रक्त तपासणी लॅब, ब्लड स्टोरेज रूममध्ये गरमीच वातावरण होत. यामुळे रक्तदान करत असताना रक्तदानत्यांना चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार घडत होते. यामुळे या रूमचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवाव्या लागत होत्या. रक्ताची गरज तातडीनं भासत असताना या गैरसोयींमुळे रक्तपेढीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होत. युवा रक्तदाता संघटनेचा माध्यमातून इशारा देताच प्रशासन खडबडून जाग झालं. यानंतर सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागाची यंत्रणा लागलीच कामाला लागली होती. . एसी दुरुस्तीसह अन्य कामांना देखील लागलीच सुरवात केली आहे. यामुळे रूग्णांची गैरसोय दुर होणार असून उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला सामोर जाव लागणारा मनस्ताप देखील टळणार आहे. देव्या सूर्याजी, मंगेश तळवणेकर यांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, ब्लड बँक कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page